मानवतेचा "स्पर्श" मनाला खुप प्रोत्साहित करणारा- मुख्यमंत्री

मुंबई दिनांक 16: स्पर्श गौरव सागरवेकर, वय वर्षे १२, गिरगावचा राहणारा, खेळणीसाठी साठवलेले ३२५७ रुपये स्पर्शने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले आणि बाल योद्धा म्हणून कोरोना विषाणुविरुद्धच्या लढ्यात आपला सहभाग नोंदवला. बालमनाला झालेला हा "मानवतेचा स्पर्श" मनाला खुप प्रोत्साहन देणारा, या युद्धाशी नेटाने लढण्यासाठी बळ देणारा असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.


वाढदिवसाच्या निमित्ताने मिळालेल्या पैशातून स्पर्शने गरजूंना १०० किलो साखरेचे वाटप केल्याचेही त्याने कळवले आहे. अशी संस्कारक्षम मुले आणि त्यांना घडवणारे पालक यांचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे. या सह्दय मदतीबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे, या बालभावनेला मला मनापासून सलाम करावा वाटतो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.



आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ३३८.११ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे.


*सढळ हाताने मदत करा*
राज्यशासन आज अनेक पातळीवर कोरोना विषाणुविरुद्ध लढत आहे अशा परिस्थितीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणगीची रक्कम जमा करून शासनाला सहकार्य करणारे सर्व हात अनमोल आहेत. ज्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करून या कामात सहभागी व्हायचे आहे त्यांच्यासाठी मदत जमा करण्याबाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे.